कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी 2 च्या घरात आता खऱ्या अर्थाने खेळाला सुरुवात झाली आहे. स्पर्धकांमध्ये सवाल ऐरणीचा हे कार्य रंगलं असून नॉमिनेशनपासून सुरक्षित राहण्यासाठी स्पर्धकांना बिग बॉसने संदेशपत्रकात लिहिलेलं टास्क पूर्ण करावे लागणार आहेत. या कार्यामध्ये कोणते स्पर्धक नॉमिनेटेड होणार आणि कोणते स्पर्धक सुरक्षित होणार? या प्रश्नांची उत्तर आजच्या भागात प्रेक्षकांना मिळतील.