पुणे-आज सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे मतदान सुरु आहे यामध्ये लोकप्रतिनिधी, नागरिक आणि कलाकार हे मोठ्या संख्येने लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होत आहे पुण्यातील लोहगाव भागात राहणारे 102 वर्षाचे आजोबा हाजी इब्राहिम जोड यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे आज रुग्णालयातून बाहेर पडून, कुटूंबातील 40 सदस्यांसोबत त्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे याही वयात मतदान करण्याविषयीचा उत्साह पाहून सर्वांनी त्यांचे कौतुक केले आहे हाजी इब्राहिम जोड यांनी आत्तापर्यंत प्रत्येक निवडणुकीत मतदान केले आहे गेल्या चार दिवसांपासुन ते आजारी आहेत मात्र त्यांनी नातवंड आणि मुलांना सांगितले की मला आज मतदान करायचे आहे त्यावर डॉक्टरची परवनगी घेऊन, रुग्णालयातून बाहेर येत मतदान करण्याचा हक्क बजावला आहे