अहमदनगर- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघात भाजप नेते राम शिंदेंचा तब्बल 43,347 मतांनी पराभव केला विजयानंतर रोहित पवार यांनी राम शिंदे यांची घरी जाऊन त्यांच्या आईंचे आशिर्वाद घेतले आहेत यामुळे जनतेच्या मनात रोहित पवारांनी जागा मिळवली आहे विजयानंतर रोहित पवार यांनी सायंकाळी चौंडी येथे येऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या मूर्तीचे दर्शन घेतले आणि नंतर राम शिंदेंच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली