सिन्नर-पंतगाने एका मुलाचा बळी घेतल्याची घटना सिन्नरमध्ये घडली आहे येथील उगले लॉन्स जवळील शेती परिसरात घडलेल्या दुर्दैवी घटनेत आर्यन विलास नवाळे या 11 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय सकाळी 9:15 च्या सुमारास पतंग पकडण्याच्या नादात हा मुलगा कठडे नसलेल्या विहिरीत कोसळला साधारण 35 फूट पाणी असलेल्या विहिरीत पडल्याने आणि कुठलीच मदत मिळू न शकल्याने त्याचा अंत झाला