Sadguru Shree Aniruddha Bapu Pravachan 20 Jun 2013 - त्रिविक्रमावरील विश्वास तुमचे जीवन बदलू शकतो

Views 4

त्रिविक्रमावरील #विश्वास तुमचे #जीवन बदलू शकतो (Faith in #Trivikram Can Transform Your #Life) - Sadguru Shree Aniruddha Bapu Pravachan 20 Jun 2013

सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी प्रवचनात ‘त्रिविक्रमावरील विश्वास तुमचे जीवन बदलू शकतो’ याबाबत सांगितले.

प्रत्येकजण काय म्हणतो? मला माझं जीवन बदलायचं आहे. असं म्हणता की नाही, कधीतरी म्हणालात की नाही की मला माझ जीवन बदलायचं आहे, बरोबर. म्हणजे करायचं काय? तुम्ही मोठं टाईम टेबल बनवता, काय काय कुठले उतारे शोधून काढता ते पाठ करता, कवायती करता, सगळं मान्य आहे. पण जीवन कोण बदलू शकतं? जी जीवन निर्माण करते, तीच जीवन बदलू शकते लक्षात ठेवा. जे तुम्ही निर्माण करू शकत नाही ते तुम्ही बदलू शकत नाही आणि जीवन निर्माण करणारी कोण आहे? ती परमेश्वराची जाणीव म्हणजेच #आदिमाता आणि आम्हाला माहीत पाहिजे की आम्ही जीवन बदलू शकत नाही. आम्ही प्रयत्न नक्की करू, आम्ही #प्रयास करायलाच पाहिजेत, #पुरूषार्थ करायलाच पाहिजे पण ती बदलण्याची ताकद कोणाची नाही आहे. नदीपर्यंत जाऊन पाणी पिण्याची जबाबदारी माझी पण नदीमध्ये पाणी कसं वाहील ही जबाबदारी कोणाची? तिची, पटतंय.
त्यामुळे इथे आम्हाला काय माहीत पाहिजे? #नामस्मरण म्हणजे काय? तर त्या जगदंबेचं किंवा तिच्या पुत्राचं, त्या चण्डिकेचं किंवा तिच्या पुत्रांचं नाम घेताना आम्हाला ह्या गोष्टीचं स्मरण राहिलं पाहिजे की ही काही ही करू शकते. हा विश्वास आमच्या मनामध्ये त्या नामाच्या स्मरणामध्ये पाहिजे की ही आमचं जीवन बदलू शकते. तुम्हाला खात्री नसेल हरकत नाही पण एवढी माहिती असली पाहिजे. तुम्ही म्हणाल ‘बापू, आमचा विश्वास नाही बसणार हो असा पटकन’, मान्य आहे आपण साधी माणस आहोत, आपला नाही पटकन विश्वास बसणार. पण कमीतकमी माहित असणं सुद्धा खूप फायद्याच आहे, की फक्त हीच जीवन बदलू शकते, हिचा हा पुत्रच आमच जीवन बदलू शकतो हे #स्मरण #नाम घेताना असणं हे अत्यंत आवश्यक आहे.

सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी प्रवचनात ‘त्रिविक्रमावरील विश्वास तुमचे जीवन बदलू शकतो’ याबाबत जे सांगितले, ते आपण या व्हिडिओत पाहू शकता.

ll हरि: ॐ ll ll श्रीराम ll ll अंबज्ञ ll
॥ नाथसंविध् ॥

--------------------------------------------------------------------------------------------------
Samirsinh Dattopadhye blog - http://www.aniruddhafriend-samirsinh.com

Watch live events - http://www.aniruddha.tv


More information about Aniruddha Bapu - http://www.aniruddhabapu.in
http://www.aniruddhafoundation.com
http://www.aniruddhasadm.com

--------------------------------------------------------------------------------------------------

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS