पुण्यात २०१७ मध्ये एल्गार परिषद घेतली. त्यानंतर जी घटना घडली. त्या प्रकरणी आमच्या परिषदेला बदनाम करण्याचे काम करण्यात आले. पण तरी देखील आम्ही आमचे विचार प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करणार आहोत. त्यासाठी आम्ही यंदा गणेश कला क्रिडा रंगमंच येथे एल्गार परिषद घेण्याबाबत परवानगी मागितली. पण ती नाकारण्यात आली असून आता आम्ही ३० जानेवारी रोजी कला क्रिडा रंगमंच येथे एल्गार परिषद घेणार आहोत असं बी. जी. कोळसे पाटील यांनी म्हटलं आहे.