फोर्टमधल्या शहीद भगत सिंग मार्गावरील लायन गेटच्या समोर जी वास्तू आहे, तिचं नाव आहे सेंट अँड्र्यूज
याला स्कॉट कर्क असंही म्हणतात. म्हणजे स्कॉटलंडहून आलेल्या लोकांनी बांधलेली ही वास्तू आहे. जसं सेंट थॉमस कॅथेड्रल हे इंग्लंडमधून आलेल्या लोकांनी बांधलं, तसं चर्च ऑफ सेंट अँड्र्यूज हे स्कॉटलंडमधून आलेल्या लोकांनी मिशनरींनी बांधलं. पण याचा जन्म या नाही तर ग्रेट वेस्टर्न या जवळच्याच इमारतीत झाला १८१५ साली. ही २५० ते ३०० वर्ष झालेली मुंबईतील सगळ्यात जुनी खासगी वास्तू आहे. चर्च, एका ब्रिटिश माणसाचं घर, राजभवन, नौसेना प्रमुखांचं निवासस्थान, मुंबई हायकोर्ट, हॉटेल ते प्रख्यात फॅशन डिझायनर्सची कार्यालयं असं बहुरंगी बहुढंगी आयुष्य बघितलेली ही वास्तू आहे. तर इथंच मुंबईतला पहिला बर्फ लोकांनी बघितला व मुंबईतलं पहिलं आइस क्रीम इथल्याच बर्फापासून बनलं अशी वास्तूही बाजुलाच आहे. या ब्रिटिशकालीन वास्तुंचा रंजक इतिहास सांगतायत खाकी टूर्सचे भरत गोठोसकर...