म्यानमारमध्ये लष्कराने बंड करत लोकप्रिय नेत्या आंग सान सूू ची यांना अटक केली. तसंच त्यांच्या नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी पक्षाचं सरकारही बरखास्त केलं आहे. एक फेब्रवारी रोजी आंग सान सूू यांना ताब्यात घेतल्यानंतर म्यानमारमध्ये सत्तांतराचं नाट्य घडलं. मात्र या सत्तांतराला देशातील नागरिकांनी विरोध केला आहे. देशभरामध्ये हजारोंच्या संख्येने लोकं रस्त्यावर उतरुन सत्तातराविरोधात आंदोलन करत आहेत.
विशेष म्हणजे या सत्तांतराला विरोध करताना अनेक लोकशाहीवादी आंदोलनकर्ते तीन बोटांनी आकाशाकडे सलाम करत आपला विरोध नोंदवत आहेत. हा तीन बोटांनी करता येणारा सलाम खास आहे. या तीन बोटांचा सलाम नक्की आहे तरी का आणि तो कुठून आला आहे?, त्याचा अर्थ काय यासंदर्भात आपण या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत.
#WhatishappeninginMyamar #Myanmar #Feb14Coup #Myanmarcoup #HungerGames #SaveMyanmar #CivilDisobedienceMovement
#RespectOurVote #Reject_the_Dictatorship #3FingerSalute