बॉलिवूड इंडस्ट्रीमधील दिग्गज अभिनेत्रींपैकी एक असलेल्या जया बच्चन गेल्या अनेक वर्षांपासून अभिनयापासून दूर आहेत. त्यांचे चाहते देखील बर्याच दिवसांपासून त्यांना मोठ्या पडद्यावर पाहण्यास उत्सुक आहेत. आता समोर येत असलेल्या बातमीमुळे त्यांच्या चाहत्यांना नक्कीच आनंद होईल. होय, जया बच्चन जवळपास 7 वर्षानंतर अभिनयाच्या क्षेत्रात पुनरागमन करणार आहेत.