कोगनोळी (बेळगाव) : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या कोगनोळी फाट्यावर महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करणार्या वाहनांना निर्बंध करण्यात आला आहे.
सोमवार तारीख 22 रोजी महाराष्ट्रातून कर्नाटक जाणाऱ्यां वाहनांना निर्बंध करण्यात आला असून मंगळवार तारीख २३ रोजी ही कारवाई कायम करण्यात आली. दोन दिवसात हजारो वाहनांना महाराष्ट्रात परत पाठवण्यात आले आहे. आरटीपीसीआर rt-pcr रिपोर्ट ची मागणी या वाहनधारकांच्या कडे करण्यात येत आहे. ज्या वाहनधारकांच्या कडे आरटीपीसीआर rt-pcr रिपोर्ट आहे. अशा वाहनधारकांना कर्नाटकात सोडण्यात येत आहे. रिपोर्ट नसणाऱ्या वाहनधारकांना परत महाराष्ट्रात पाठवण्यात येत आहे.
बातमीदार - अनिल पाटील