नवी मुंबईतील बेलापूर परिसरातील खाडीत लगतच्या भागातून एका मगरीला अखेर बाहेर काढण्यात आले आहे. याबद्दल वन विभागाकडून माहिती दिली गेली आहे. ही मगर 6.43 फूट असून तिचे वजन 35.4 किलो आहे. गेल्या काही वर्षांपासून ही मगर गटार आणि खाडीत फिरत होती. या मगरीचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाल्याचे ठाणे वनाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.