पुणे - मोक्का कायद्यानुसार कारवाई झालेला माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बराटे याचा जामीन सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर ही तो अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये. त्यामुळे आता पोलिसांनी त्याच्या स्थावर मालमत्ता जप्त करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू केले आहेत. न्यायालयाकडून मालमत्ता जप्तीचे आदेश प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई केली जात आहे. न्यायालयाकडून प्राप्त झाल्यानंतर पोलिसांकडून मालमत्ता जप्तीची कारवाई केली जात आहे याचा आढावा घेतला आहे सागर आव्हाड यांनी.