गुमगाव (जि. नागपूर) : उपराजधानीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वानाडोंगरीच्या वैभवनगर येथील सुनील तिवस्कर आणि सविता तिवस्कर यांचा २१ वर्षीय मुलगा प्रज्वलने विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण झाल्यावर मेडिकल, इंजिनीअरिंग सारख्या क्षेत्राकडे न वळता वेगळी आणि नावीन्यपूर्ण वाट निवडली आहे. चित्रकला विषयात आवड असलेल्या प्रज्वलने याच कलेतील कौशल्य आत्मसात करणे सध्या सुरू केले आहे. प्रज्वलने रेखाटलेले स्केच, लँडस्केप, पोर्टेट, थर्माकॉल वर्क आणि वॉल डिझायनिंग सध्या अनेकांना आकर्षित करीत आहे. बारावी विज्ञान शाखेतून ७५ टक्के गुण प्राप्त करून उत्तीर्ण झालेल्या प्रज्वलने इतर कोणत्याही क्षेत्राचा विचार न करता आपल्या आवडीच्या चित्रकलेतच शिक्षण करण्याचा निश्चय केला. बारावीनंतर 3D ऍनिमेशनमध्ये डिप्लोमा केलेल्या प्रज्वलच्या 'आर्ट'ने सगळ्यांनाच मोहित केलेले असून कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रमंडळीकडून आता प्रज्वलच्या पाठीवर कौतुकाची थाप मिळत आहे. (व्हिडिओ : रविंद्र कुंभारे)
#sakalmedia #nagpur #maharashtra