राजुरा (जि. चंद्रपूर) : आरटी वन विभाग मुळे चर्चेत आलेल्या मध्य चांदा वन विभागांतर्गत राजुरा वनपरिक्षेत्रतील जोगापुर-राजुरा पर्यटनाला सुरुवात होऊन एक आठवडा लोटला आहे. आठवड्याभरात वन पर्यटकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला आहे. तब्बल आठवड्याभरात ते 51 वाहनांमधून 250 पेक्षा अधिक पर्यटकांनी हजेरी लावलेली आहे. सलग पहिल्या व दुसऱ्या दिवशी जोगापुर-राजुरा सफारी क्षेत्रात व्याघ्रदर्शन झाल्यामुळे पर्यटकांचे आकर्षण वाढले आहे. नागरिकांचे दहा बळी घेणाऱ्या आर टी वन वाघाच्या वनपरिक्षेत्रात आता नागरिकांना भ्रमंती करायला मिळणार आहे.आर टी वन वाघाला जेरबंद केल्यानंतर या क्षेत्रात वन पर्यटनाला सुरुवात झालेली आहे. उद्घाटनानंतर सलग दोन दिवस वाघाचे दर्शन झाल्यामुळे वन पर्यटकांत उत्सुकता वाढलेली आहे. शनिवार आणि रविवारी सुट्टीच्या दिवशी मोठ्या संख्येने भ्रमंती करणाऱ्या पर्यटकांची गर्दी होत आहे. (व्हिडिओ : आनंद चलाख-श्रीकृष्ण गोरे)