अनेक शहरांमध्ये रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. सध्या सरकारने धार्मिक व सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. अशा परिस्थितीमध्ये मंदिरेही पुन्हा बंद होतात की काय अशी भीती वाटू लागली. आता अंगारकी चतुर्थी दिवशी मुंबईतील प्रसिद्ध सिद्धीविनायक मंदिरामध्ये जाऊन बाप्पांचे दर्शन घेता येणार नाही. या दिवशी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.