शरीराच्या योग्य वाढीसाठी पोळी, भाजी, भात या पदार्थांची आवश्यकता आहे. तशीच दूध आणि दुग्दजन्य पदार्थांचीही तितकीच गरज असते. त्यामुळे दही, ताक, लोणी आणि तूप यांचा आहारात समावेश करावा. तूपामुळे वजन वाढतं किंवा स्थुलता येते असा अनेक जणांचा गैरसमज आहे. मात्र, तसं अजिबात नसून तुपामुळे शरीराला वंगण मिळतं. त्यामुळे आहारात दररोज साजूक तुपाचा वापर केला पाहिजे. तूप खाण्याचे काही फायदे आज आपण जाणून घेणार आहोत.