हातकणंगलेत शिवसेना, भाजपला पडले खिंडार
कोल्हापूर : हातकणंगले येथील शिवसेना कार्यकर्ते संदीप कारंडे , आणि भाजप प्रवक्ते रामदास कोळी इचलकरंजी शेकडो कार्यकर्त्यांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला .याबाबत आज कोल्हापुरात ही घोषणा करण्यात आली. संदीप कारंडे शिवसेना, भाजप प्रवक्ते रामदास कोळी इचलकरंजी हे गेली अनेक वर्ष राजकारण आणि समाजकार्य यामध्ये सक्रिय आहेत. मात्र भाजप शिवसेना पक्षातील कामाबाबत नारज होऊन ते आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला.