कोल्हापूर : लेथ मशिनचा आवाज सुरू होता. हातातील बांगड्या सावरत आणि कंबरेला पदर खोचून एक महिला उभी होती. एकीकडे जॉबची ऍक्युरेसी पाहताना दुसरा हात स्टार्टर बटनवर. त्यांची नजर मात्र जॉबच्या केंद्रबिंदूवर. कपाळावर कुंकू, साधी राहणी आणि स्पष्ट बोलणं हा त्यांचा स्वभाव. मंदीच्या काळात पतीला साथ देणाऱ्या याच रणरागिणीचं नाव सुनिता विनोद कामते.
"मी तुमच्या सोबते येते, कारखान्यात बसून राहते, पण कारखाना बंद करायचा नाही, असा आग्रह मी पतीकडे धरला. पहिले एक-दोन दिवस रिकामेच गेले. पण तिसऱ्या- चौथ्यादिवशी कामे येवू लागली. कामगार कोणीही नव्हते म्हणून मी त्यांना हातभार लावला आणि मी थेट लेथ मशिनसमोर उभी राहिले. "वर्म थ्रीडींग'चे काम करण्यासाठी कोकणात (मालवण) तीन दिवस लागत होते. मात्र तेच काम मी एक दिवसांत करून दिले. एका स्पिनिंग मिलमधील काम पूर्ण करायचे होते. त्यामुळे आम्ही दोघांनी मध्यरात्री दोनपर्यंत न थांबता काम पूर्ण केले.
(बातमीदार - लुमाकांत नलवडे )
(व्हिडीओ - बी.डी.चेचर)