बीड : जिल्ह्यात अवैध वाळू उपसा व वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते. शुक्रवारी पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने छापा टाकून सावरगाव (ता. गेवराई) जवळ गोदावरी नदीपात्रातून चोरटी वाळू वाहतूक करणारे आठ ट्रॅक्टर पकडले.
कारवाई ५८ लाखांचा मुद्देमाल जप्त करुन चालक-मालक अशा १६ जणांवर गुन्हे नोंद करण्यात आले.