पैठण ः नांदर (ता.पैठण) येथील रमाई आवास योजना मंजुरी झाली मात्र ही यादी तात्काळ रद्द अशी मागणी करत कैलास मगरे, नामदेव मगरे यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे. नांदर येथील घरकुल योजनेच्या प्रशासकीय मान्यता यादीत जी नावे आहे त्या लाभार्थ्यांकडे चारचाकी, दुचाकी गाड्या आहे. तसेच काही जण नोकरदार असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामध्ये अपात्र नावे वगळुन निकषानुसार लाभार्थ्यांची निवड करण्याच मागणी करण्यात आली आहे.
(व्हीडीओ- दिगंबर सोनवणे, दावरवाडी)