रविवार दिनांक 14 मार्च रोजी पहाटेच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत भगतवाडी,बहुली तालुका हवेली जिल्हा पुणे येथिल तब्बल सोळा घरे जळून खाक झाली. घरातील अन्नधान्य, कपडे, मौल्यवान वस्तू, दाग दागिने यांची राखरांगोळी झाली. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी भगतवाडीला भेट देऊन घरं जळालेल्या कुटुंबांचे सांत्वन केले. नाम फाउंडेशन च्या माध्यमातून दोन महिन्यांमध्ये या लोकांसाठी घरं बांधून देण्यासाठी पुढाकार घेतला जाईल असे नाना पाटेकर यांनी यावेळी सांगितले.