पुणे जिल्ह्यातील एरंडवणे भागात बमहीला सेवा मंडळाच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये भयंकर प्रकार घडला आहे . क्वारंटाईन सेंटरमध्ये 18 वर्षीय तरुणीला ठेवले होते. ही तरुणी मूळ दिल्लीची असल्याची माहिती आहे. मात्र तिने खोलीच्या खिडकीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. अणि ती खिडकीच्या जाळित अडकली.