औरंगाबादः शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने शनिवार आणि रविवार अशा दोन दिवस कडक लॅाकडाऊन जाहिर करण्यात आला आहे. तसेच 17 मार्च पासून हॅाटेलमध्ये फक्त पार्सल सुविधा राहिल हा निर्णय घेतल्यानंतर आज जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांनी शहरातील धर्मगुरु यांची बैठक घेतली. याबाबत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी माहिती दिली. (व्हिडिओ-मधुकर कांबळे)