पुण्यातील नेहमी गजबलेल्या ठिकाणांपैकी एक असलेल्या महात्मा गांधी रोडवर असलेल्या फॅशन स्ट्रीट मार्केटला आगीची नजर लागली. शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास लागलेल्या आगीने फॅशन स्ट्रीट क्षणार्धात कवेत घेतलं आणि बघता बघता आगीच्या लोळांनी कापडाची दुकानं व गोदामानं वेढा घातला. साडेतीन तास सुरू असलेल्या या महाभंयकर अग्नितांडवात साडेचारशे दुकानांचा कोळसा झाल्याने फॅशन स्ट्रीटची राखरांगोळीच झाली.
#Fire #Pune #FashionStreetPune