राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबईतील घरावर सीबीआयने शनिवारी सकाळी छापा टाकला. तसेच, त्यांच्या इतर मालमत्तांवर देखील सीबीआयने छापेमारी केली. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पत्रामधून केलेल्या आरोपांनंतर या प्रकरणाची सीबीआयकडून चौकशी सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे.