राज्य सरकारने नव्या निर्बंधांमध्ये लग्नसमारंभातील उपस्थिती देखील मर्यादित केली आहे. मात्र, असं असतानाही जळगाव शहरात मात्र या नियमांना हरताळ फासून बिनबोभाट १५० माणसांच्या उपस्थितीत लग्नसोहळा सुरू होता! पण नियमांना गृहीत धरण्याची ही वृत्ती वर-वधूच्या पित्याच्या चांगलीच अंगलट आली!