टाळमृदंगाचा गजर आणि हरिनामाचा जयघोष करीत निघालेला माउलींचा पालखी सोहळा शेतशिवारातील वाटचालीचा आनंद घेत शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास मल्हारनगरीत विसावला. या वेळी माउलींच्या पालखीवर मल्हारगडवासीयांनी बेलभंडारा आणि खोबऱ्याती मुक्त उधळण केली. वारीचा सोहळा पिवळ्याधमक भंडाऱ्यात न्हाऊन निघाला. "येळकोट येळकोट जय मल्हार'बरोबरच "माउलीं'च्या जयघोषाने अवघी जेजुरी दुमदुमून गेली.