मागील काही दिवसांपासून देशभरातील अनेक ठिकाणांहून खासगी आणि सरकारी रुग्णालयांनी राज्य सरकारांना एसओएस मेसेज पाठवून आप्तकालीन परिस्थितीचा इशारा दिल्याच्या बातम्या समोर येत आहेत. दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरातील अनेक खासगी रुग्णालयांनी एसओएस मेसेजच्या माध्यमातून यंत्रणांना ऑक्सिजन अपुरा पडत असल्याचे सांगितल्याच्या बातम्या पाहावयास मिळत आहेत. मात्र हा एसओएस संदेश नेमका असतो तरी काय?, त्याचा अर्थ काय?, तो कधी पाठवतात?, मुळात या शब्दाचा जन्म कसा झाला यासंदर्भात अनेकांना फारशी माहिती नसते. याचसंदर्भात आपण या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत.
#SOS #medicalemergency #COVID19