बंगळूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी हा हुकमी एक्का आणि अध्यक्ष अमित शहा यांच्या प्रचारयंत्रणेच्या जोरावर भाजपने कर्नाटकची मोहीम जिंकत दक्षिणेत पाय रोवण्यास सुरवात केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये कल स्पष्ट होताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयासमोर जोरदार जल्लोष केला.