डाऊन सिंड्रोम असूनही हार न मानत स्पेशल ऑलिंपिकपर्यंत मजल मारलेली स्पेशल क्रीडाप्रकारातील जलतरणपटू गाडगीळने आगामी स्पर्धांसाठी कसून तयारी कायम ठेवली आहे. गौरी पुढील वर्षी कोलकत्यामधील भागिरथी नदीत होणाऱ्या तसेच पोरबंदरमधील अरबी समुद्रात होणाऱ्या स्पर्धांसाठी सराव करीत आहे. जिच्या जीवनावर यलो चित्रपट निघाला आणि ज्यातील भूमिकेमुळे गौरीला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला ती गौरी रुपेरी दुनियेत झळकरी असली तरी सोनेरी यशाचे तिचे वेध कायम आहेत.