केदारनाथ (उत्तराखंड) : लोकसभा निवडणुकीचा प्रचार आटोपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केदारनाथ धामला भेट देत महादेवाचे दर्शन घेतले, तसेच येथे पूजाविधीही केला. पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे या भागात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मागील दोन वर्षांतील पंतप्रधान मोदींचा हा चौथा केदारनाथ दौरा आहे.