पुणे : पुणे - मुंबई या दोन शहरादरम्यान धावणारी आणि दख्खनची राणी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या 'डेक्कन क्विन' रेल्वे गाडीने आज 90 व्या वर्षात पदार्पण केले आहे. त्यानिमित्त पुणे स्टेशनवर या गाडीचा वाढदिवस साजरा केला. वाढदिवस साजरा केला जाणारी ही एकमेव ट्रेन आहे.