औरंगाबाद : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही काही कंपन्या सुरुच होत्या, कामगारांच्या तक्रारीनंतर त्या कंपन्यांना मनसे पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (ता. २३) मनसे स्टाईल दणका दिला. दोन्ही कंपन्या बंद करूनच अखेर मनसैनिक परतले. दरम्यान, मनसैनिकांवर दादागिरीचा प्रसंग घडल्याने प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोचले होते.