कोरोनावर मात करण्यासाठी पुण्याच्या माय लॅबचा यशस्वी प्रयोग
सेरम व एपीजी यांच्या सयुंक्त विद्यमाने मोठ्या प्रमाणावर तयार करण्यात येणार टेस्टींग किट्स
जगभरात कोरोना वायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असताना त्याच्या निदानासाठी आवश्यक असणारी व एफडीए ची मान्यता असणारी पहिली टेस्टींग किट पुण्यातील माय लॅब यासंस्थेने तयार केली आहे. या किटचा तुटवडा होऊ नये व भारतातील तसेच जगातील प्रत्येक देशात कोरोनाचे निदान करण्यात यावे यासाठी आता या संस्थेने पुण्यातील ए पी ग्लोबाले व सेरम या जगातील सर्वात मोठ्या औषध निर्मिती करणाऱ्या संस्थेसोबत करार केला आहे. येत्या काळात एका आठवड्यात वीस लाखापेक्षा जास्त किट्स या संस्थेद्वारे पुरवण्यात येणार आहे.
याविषयी सकाळच्या टीमने माय लॅबच्या मॅनेजिंग डायरेक्टर हसमुख रावल यांच्याशी संवाद साधलाय,
पाहा सकाळचा हा स्पेशल रिपोर्ट