मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. मराठा आरक्षण व पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या संदर्भातील याचिकांवर ही सुनावणी होती. यावेळी न्यायालयाने १५ जुलै रोजी अंतरिम आदेश दिला जाईल असं सांगितलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कोणत्याही प्रकारे निकाल देऊ शकत नाही असं मत व्यक्त केलं. न्यायालय नियमित सुरु झाल्यावर मराठा आरक्षण सुनावणीवरील निकाल देता येणार असल्याचंही सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे.
दरम्यान या सुनावणीत कोल्हापूरमधून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे खा.संभाजीराजे उपस्थित होते.
सुनावणी नंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला...
व्हिडीओ - संभाजी थोरात