गुमगाव (जि. नागपूर) : दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या दमदार पावसामुळे गुमगाव परिसरातून वाहणारी वेणा नदी दुथडी वाहत आहे. बुधवारी सकाळी परिसरातील मजूर, शेतकरी, कामगार, दुग्धव्यावसायिक कामकाजासाठी घराबाहेर पडल्यानंतर वेणामायचे रौद्ररूप बघून काहीसे थबकले. वागदरा (नवीन गुमगाव) आणि धानोली गावाला जोडणाऱ्या पुलावरून वेणा नदीचे पाणी वाहत असल्याने काही काळासाठी गावाचा संपर्क तुटला. याशिवाय कोतेवाडा परिसरातून ओसंडून वाहणाऱ्या नाल्याने वाहनचलकांचा वाट अडवली. नदीचे रौद्ररूप पाहण्यासाठी अनेकांनी धाव घेतली. काहींनी "सेल्फी' काढून आपली हौस भागवली. (व्हिडिओ : रवींद्र कुंभारे)