लॉकडाउनने बदलला जगण्याचा, उदरनिर्वाहाचा मार्ग | आजच्या ठळक बातम्या | मराठी ताज्या बातम्या |

Sakal 2021-04-28

Views 260

मूल (जि. चंद्रपूर) : कोरोनाच्या महामारीत सर्वसामान्य नागरिकांसह हातावर पोट असणाऱ्यांची चांगलीच होरपळ झाली. लॉकडाउनमध्ये जगायचे कसे, असा प्रश्‍न भेडसावला. फुटपाथवरील हातठेल्यावर खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांची चांगलीच गोची झाली. गर्दी होत असल्याच्या कारणासाठी अजूनही हातठेलावरील खाद्यपदार्थ विक्री बंद आहे. संसाराचा गाडा हाकायचा कसा, असा प्रश्न पडलेल्या अशाच एका हातठेला चालकाने घरोघरी जाऊन समोसे विक्री करणे सुरू केले आहे. त्यातून मिळणाऱ्या मिळकतीतून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे. स्वत:च्या घरी बनविलेले गरमागरम समोसे आणि वडे तुटक्‍याफुटक्‍या स्कुटीवर मांडून सकाळी आणि दुपारी शहरभर फिरून विक्री करीत आहे. किशोर बोरकुटे असे या समोसे विक्री करणाऱ्या हातठेला चालकाचे नाव आहे. (व्हिडिओ : विनायक रेकलवार)

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS