नागपूरसह विदर्भातील शनिवारच्या महत्वाच्या घडामोडी | Marathi News | आजच्या ठळक बातम्या | Sakal Media

Sakal 2021-04-28

Views 609

बेला (नागपूर) : खुर्सापार नजिक असलेल्‍या वडगाव येथे मानस ॲग्रो अॅंड इम्‍फ्रा. लिमीटेड या कारखान्‍यात दुपारी ब्‍लास्‍ट होऊन पाच जणांचा मृत्‍यू झाल्‍याची ह्रदयद्रावक घटना घडली.

नागपूर : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या विस्तार सेवा मंडळातर्फे संस्कृत महोत्सव 2020 येत्या सोमवारी (ता.३) ऑनलाइन माध्यमातून साजरा केला जाणार असल्याची माहिती कुलगुरू प्रो. श्रीनिवास वरखेडी यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरवर्षी श्रावण पौर्णिमेला संस्कृत दिन साजरा केला जातो.

नागपूर : उपराजधानीतील ज्येष्ठ पुरातत्त्व संशोधक, इतिहासतज्ज्ञ, लेखक व संस्कार भारतीचे माजी अखिल भारतीय प्राचीन कला विधा संयोजक डॉ. श्रीपाद चितळे यांचे आज सकाळी महालमधील राहत्या घरी ब्रेन हॅमरेजने निधन झाले. मृत्युसमयी ते ६८ वर्षांचे होते.

अमरावती : कोरोनाचा फटका इतर व्यवसायाप्रमाणेच शेतीपुरक व्यवसायांनाही बसला आहे. परिणामी दूधाचे भाव आणि खप घसरला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दुधाला भाव मिळण्यासाठी अमरावती येथे भाजप व किसान मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्गावर दुधाच्या गाड्या अडवून आंदोलन केले.

अमरावती : एकेकाळी गुन्हेगारी जगतात एकमेकांचे सहकारी असलेल्यांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू झाली. त्यातून एकाने जुन्या साथीदाराचा खून केला. शुक्रवारी (ता. ३१) रात्री शोभानगरात ही घटना घडली.

देसाईगंज (जि. गडचिरोली) : जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा वाढता धोका व प्रशासनाचे निर्देश लक्षात घेत तंबाखूजन्य पदार्थांची विक्री पूर्णत: बंद करण्यासाठी मुक्तिपथ अभियान व देसाईगंज किराणा व्यापारी असोसिएशनची बैठक नुकतीच पार पडली होती. तंबाखू विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यासंदर्भातील निवेदन असोसिएशनतर्फे पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी रूपाली बावनकर यांना सादर केले. यावेळी तंबाखू विक्रेत्यांवर पोलिस प्रशासन कारवाई करणार असल्याची ग्वाही बावणकर यांनी दिली.

#Nagpur #NagpurNews #Vidarbha #VidarbhaNews #News #SakalNews #Sakal #MarathiNews #Amravati #Yavatmal #Bhandara #Gondia #Chandrapur #Gadchiroli #Wardha

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS