राजुरा (जि. चंद्रपूर) : चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील निसर्गरम्य पर्वतरांगामध्ये राज्यातील एक प्राचीन किल्ला चंद्रपूरच्या दक्षिणेस 27 किलोमीटरवर आहे. हा किल्ला इ.स. नवव्या शतकात वैरागडच्या नागवंशीय 'गहिलू' या माना राजाने बांधला. माना नागांची व बस्तरच्या नागाची कुलदेवता माणिक्यदेवी होती. राजाने या किल्ल्यास आपल्या कुलदेवतेचे नाव दिले. किल्ला म्हणजे 'गड' व माणिक्यदेवीच्या नावे म्हणून 'माणिकगढ' असे नाव प्रचलित झाले. निसर्गरम्य परिसरात वसलेला ऐतिहासिक प्राचीन किल्ला पर्यटनापासून वंचित आहे. अमलनाला व माणिकगड किल्ल्याच्या पर्यटनास चालना दिल्यास या भागातील नागरिकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो.
(व्हिडिओ : सिद्धार्थ गोसावी, आनंद चलाख)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.