दख्खनचा राजा जोतिबाच्या महात्म्यावर आधारित "दख्खनचा राजा जोतिबा' ही मालिका आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कोल्हापूर चित्रनगरीत सलग चार वर्षे मालिकेचे शुटींग सुरू राहणार असून चित्रनगरीत भव्य सेट उभारला जाणार आहे. त्याचा भूमीपूजन समारंभ रविवारी निर्माता महेश कोठारे, नीलिमा कोठारे, अभिनेता आदिनाथ कोठारे, अभिनेत्री उर्मिला कोठारे, कला दिग्दर्शक संतोष फुटाणे, चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक संजय पाटील आदींच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
बातमीदार : संभाजी गंडमाळे
व्हिडिओ एडीटींग : मोहन मेस्त्री