उमरेड (जि. नागपूर) : श्रीगणेशाच्या आगमनाच्या पूर्वी दरवर्षी हरितालिका अर्थात गौराई, देवाधिदेव महादेवाच्या अर्धांगिनी माता पार्वतीचे पूजन (व्रत) माता भगिनी नित्यनेमाने करीत असतात. आपल्या पतीच्या दीर्घायुषासाठी हे व्रत मोठ्या उत्साहाने दरवर्षी करीत असतात. स्थानिक गाव तलाव येथे गौरीला स्नान करण्यासाठी आणतात. त्यानंतर तेथील महादेवाच्या मंदिरात पूजा-अर्चना केली जाते. दरवर्षी गौरीचे स्नान करण्यासाठी गर्दीने गजबजून जाणाऱ्या गाव तलावाच्या तटावर यंदा मात्र मोजक्याच माता भगिनी दिसून आल्या. (व्हिडिओ - सतीश तुळसकर)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.