जागृत काळा गणेश मंदिर देवस्थान | Latest Marathi News I आजच्या ठळक बातम्या | मराठी ताज्या बातम्या |

Sakal 2021-04-28

Views 3

उमरेड (नागपूर) : स्थानिक मंगळवारी पेठ परिसराला प्राचीन देवस्थानाची भूमी म्हणून ओळख प्राप्त आहे, इथे पाताळेश्वर पंचमुखी महादेव मंदिराच्या शेजारीच जागृत काळा गणपती देवस्थान आहे, या मंदिराची स्थापना सुमारे २०० ते २५० वर्षांपूर्वी झाली असल्याचे सांगितले जाते.
मंदिराच्या गाभाऱ्यात मुख्यस्थानी स्थित दोन सव्वादोन फूट उंचीची पूर्वाभिमुख गणेश मूर्ती ही काळ्या पाषाणात कोरलेली असून तिच्या शेजारी डाव्या बाजूला अन्नपूर्णा माता, तर उजव्या बाजूला रथावर स्वार सुर्यदेवतेची काळ्या पाषाणाची मूर्ती आहे, समोरील डाव्या बाजूला श्री विष्णुसोबत माता लक्ष्मी आणि पक्षीराज गरुड स्थानापन्न झाले आहेत.
गणेशाचे सर्व अलंकार जसे कंबरपट्टा, बाजूबंद, जाणवे, गळ्यातील कंठा तसेच मुक्तावर सर्वत्र नाग आढळून येतात म्हणून ही गणेशमूर्ती नागबांधन गणेशमूर्ती म्हणून प्रचलित आहे. शिवाय गाभाऱ्यात श्रीगणेश प्रधान मूर्ती असल्याने पंचायतन मूर्ती असेही म्हणतात.
(व्हिडिओ : सतीश तुळसकर)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS