कसबा बावडा - देव काय असतो हे कोरोना उपचारातून बरे झालेल्या रुग्णांनाच माहीत आहे. एकीकडे कोरोनाग्रस्तांना बेड मिळत नाही, वेळेत उपचार मिळत नाही, अशी स्थिती असताना कसबा बावड्यातील जनरल प्रॅक्टिस करणारे डॉक्टर मात्र देवदूत ठरले आहेत. सर्दी, खोकला ही कोरोनाची लक्षणे. पण, अशा रुग्णांवर शहराच्या इतर भागात अनेक डॉक्टर घाबरून उपचार करीत नाहीत. परंतु, कोल्हापुरातील बावड्यातील सर्वच डॉक्टरांनी स्वतःबरोबरच इतर रुग्णांची काळजी घेत सुरू केलेल्या उपचारांमुळे हे डॉक्टर देवदूत बनले आहेत.