पावसाळ्यात बहरला अमलनाला डॅम I Live Marathi News | आजच्या ठळक बातम्या | मराठी ताज्या बातम्या |

Sakal 2021-04-28

Views 4

कोरपना (जि. चंद्रपूर) : पावसामुळे नटलेल्या हिरव्या डोंगर रांगा, जलाशयातील पाण्याचा प्रचंड साठा, पावसामुळे ओव्हर फ्लो झालेला धरणाचा वेस्ट वेअर, निसर्गाच्या सानिध्यात मनमुराद आनंद लुटणारे पर्यटक हे विलोभनीय दृश्य पावसाळ्यात अमलनाला डॅम परिसरात अनुभवायला मिळते. गडचांदूरपासून काही अंतरावर असलेल्या आम्हाला डॅम परिसर पावसाळ्यात बहरून येतो. पावसाळ्यात परिसरातील पर्यटकांची मोठी गर्दी इथे उसळते. मात्र, पुरेशा सुविधाअभावी हा भाग अजूनही विकासापासून वंचित आहे. जिवतीकडे जाणारा नागमोडी वळणांचा रस्ता, तिन्ही बाजूने वेढलेले डोंगररांगा आणि त्यामधील विस्तीर्ण जलसाठा, या नैसर्गिक दृश्याला स्पर्श करणारे आकाशातील काळेभोर ढग पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे फिटतात. निसर्गाचे वरदान लाभलेला हा परिसर अजूनही विकासापासून वंचित आहे. पावसाळी पर्यटनाला चालना देणारा हा स्थळ विकसित व्हावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केलेली आहे. (व्हिडिओ : सिद्धार्थ गोसावी-आनंद चलाख)

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS