मराठी भाषेच्या वापराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर येईल अशी एक घटना काल चर्चेत होती. लेखिका शोभा देशपांडे यांनी मराठी भाषेच्या आग्रहाखातर मुंबईतील एका सराफाच्या दुकानासमोर धरणे आंदोलन केले. महाराष्ट्रात मराठी भाषाच वापरली गेली पाहिजे, ही मागणी तशी जुनीच आहे. मराठीच्या मुद्यावरुनच शिवसेनेचंही राजकारण सुरु झालं होतं आणि मराठीचा मुद्दा घेऊनच राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष स्थापन केला आहे. त्यामुळे हा विषय तसा काही नवा नाही. या विषयाच्या अनुषंगाने अनेक आंदोलने आणि चर्चा याआधीही घडल्या आहेतच. शोभा देशपांडे यांच्याबाबतीत जे घडलं ते धक्कादायकच आहे आणि दुकानदाराने दाखवलेला मुजोरपणाही निषेधार्हच होता. त्याला कायद्यानुसार शिक्षाही व्हावीच व्हावी. मात्र, कायदा हातात घेऊन कुणालाही मारहाण करण्याचे समर्थन आपल्याला करता येणार नाही. या विषयासंदर्भात आणखी महत्वाच्या कंगोऱ्यांवर नक्कीच चर्चा करता येईल.
#SocialMedia #Sakal #SakalMedia #Marathi #Bhasha #marathibolachalval #martubhasha