ते आजारी होते, मात्र त्यांना कुठे ना कुठे बिहारचे मुख्यमंत्री असलेल्या नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्षाविरोधात असलेल्या अँटी इन्कम्बन्सीचा अंदाज होता. म्हणूनच त्यांच्या लोकजनशक्ती पार्टीने एनडीएचा भाग असूनही बिहारच्या या विधानसभा निवडणुकीत जेडीयूविरोधात आपला शड्डू ठोकला आहे. राज्यात भाजपशी निवडणुकीपुरता दुरावा आणि जेडीयूशी थेट लढण्याचे आव्हान त्यांच्या पक्षाने स्विकारले आहे. रामविलास पासवान यांच्या मृत्यूनंतरच्या सहानुभूतीचा त्यांच्या पक्षाला फायदा होईल का, हे पाहणं निर्णायक ठरेल. त्यांचा हा निर्णय चूकीचा आहे की बरोबर याचा निर्णय आपल्याला 10 नोव्हेंबर रोजी समोर येणाऱ्या निकालावरुन स्पष्ट होईलच.
#Ramvilaspaswan #Bihar #politics #News #Sakal #Sakalmedia #Sakalnews