कोल्हापूर - शारदीय नवरात्रोत्सवात करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा पालखी सोहळा रोज रात्री साडेनऊ वाजता संपन्न होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा मंदिर दर्शनासाठी बंद आहे. त्यामुळे पालखी सोहळाही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडतो आहे. रविवारी रात्री देवस्थान समितीचे पदाधिकारी श्रीपूजक आणि मानकरी यांच्या उपस्थितीत पालखी सोहळा पार पडला. या पालखी सोहळ्यात पोलीस बँड आकर्षण होता.