पिंपरी ः कोरोना व लॉकडाउनच्या काळामध्ये मीटर रिडिंग न घेताच महावितरणने अंदाजे वीज बिले पाठविली आहेत. शिवाय, एक एप्रिलपासून वीजदर वाढविले आहेत. त्यामुळे नागरिकांना नेहमीपेक्षा दुप्पट-तिप्पट रकमेची तर काहींना दहा पट रकमेची बिले आली आहेत. ही वीजबिले दुरुस्त करून मिळावीत, व वीजदर आकार कमी करावा, या मागणीसाठी शहर भाजपतर्फे महावितरण कार्यालयांवर आंदोलन करण्यात आली.
पिंपरी-चिंचवड शहराची महावितरणने दोन भागात विभागणी केली आहे. पिंपरी व भोसरी विभाग अशी रचना आहे. त्यांच्या अंतर्गत काही सबस्टेशन आहेत. पिंपरी विभागाचे कार्यालय पिंपरीगावात असून भोसरी विभागाचे कार्यालय टेल्को रस्त्यावरील बालाजीनगरजवळ एमआयडीसीत आहे. पिंपरी विभागांतर्गत सर्वाधिक ग्राहक घरगुती व व्यापारी आहेत. तर भोसरी विभागांतर्गत औद्योगिक व व्यापारी ग्राहकांची संख्या सर्वाधिक आहे. कोरोना व लॉकडाउनच्या काळात सर्वच कंपन्या बंद होत्या. तरीही सुद्धा भरमसाठ विजबिले आली आहेत. त्यामुळे लघुउद्योजकांपुढील अडचणीत वाढ झाली आहे.
वाढीव दराने व अंदाजे रिडिंगनुसार आलेल्या वीज बिलांमध्ये दुरुस्ती करावी व वीजदरवाढ रद्द करावी, या मागणीसाठी शहर भाजपने आज महावितरणच्या बिजलीनगर सबस्टेशनवर मोर्चा काढून अभियंत्यांना मागण्यांचे निवेदन दिले. महापालिकेतील पक्षनेते नामदेव ढाके यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आला. नगरसेविका करुणा चिंचवडे, मोनाताई कुलकर्णी, नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ, योगेश चिंचवडे, पल्लवी वाल्हेकर, शेखर चिंचवडे आदी सहभागी झाले होते. मागण्यांचे निवेदन उपअभियंत्यांना देण्यात आले.
#MSEB #BJP #sakal
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.