राजगुरूनगर, ता. १० : पुणे नाशिक महामार्गावर खेड घाटात कंटेनर बंद पडल्यामुळे आज ( १० डिसेंबर ) सकाळी चार तास वाहतूक कोंडी होऊन दोन दोन किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या. खेड घाटामध्ये दोन तीन तास अडकून राहण्याची वेळ प्रवाशांवर आली. त्यामुळे वाहनचालक, प्रवासी आणि वाहतूक पोलीसही वैतागून गेले. खेड घाटाच्या बाह्यवळणाचे काम संथ गतीने सुरू असल्याने अजूनही वाहतूक कोंडीस सामोरे जावे लागत आहे.
मंचर बाजूने घाटाच्या दुसऱ्या वळणावर कंटेनर बंद पडल्याने सकाळी आठ वाजल्यापासून वाहतूक कोंडीला सुरुवात झाली. घाटात सात आठ पोलिसांनी वाहतुकीचे नियमन करूनही वाहतूककोंडी होतच होती. वाहतूक कोंडीतून सटकण्यासाठी चालक आडव्यातिडव्या गाड्या घुसवत होते आणि त्यातून जास्तच कोंडी होत होती. घाटाच्या दोन्ही बाजूंनी कोंडी झाल्यामुळे प्रवासी आणि वाहनचालक अक्षरशः वैतागले होते. प्रवाशांची अवस्था अक्षरशः ना घर का ना घाटका अशी झाली. घाटात अडकल्याने पुढेही सरकता येईना आणि मागेही जाता येईना अशी अडचण झाली. त्यामध्ये एक रुग्णवाहिकाही अडकली होती. खूप प्रयत्नानंतर कंटेनर बाजूला काढण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर १२ वाजल्यानंतर कोंडी हळूहळू सुटली.,राजेंद्र सांडभोर,बातमीदार
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.