१८ वर्षानंतर उभारले शहीद जवानाचे स्मारक, आई-वडिलांच्या हस्ते केले उद्घाटन | Amravati | Sakal Media |

Sakal 2021-04-28

Views 596

तिवसा शहरातील विद्युत कॉलनी येथील सुदामराव श्रीखंडकर यांचे लहान सुपुत्र सचिन श्रीखंडकर हा 12वीचे शिक्षण घेऊन 1999साली सैन्यात भरती झाला होता. तेव्हा सचिनचे वय 18 वर्ष होते. अवघ्या सैन्यात तीन वर्ष होत नाही तर 19 जुलै 2002 ला सचिनला वीरमरण आले. सचिनच्या जाण्याने श्रीखंडकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. आज सचिनला जाऊन 18 वर्षे पूर्ण होत असताना इतक्या वर्षानंतरही तिवसा शहरात शहीद स्मारक नसल्याने शहीद प्रेमींकडून नाराजी व्यक्त केली जात होती. लोकप्रतिनिधी व शहरातील प्रतिष्ठित लोकांकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे वृत्त 'सकाळ'मध्ये सचिन श्रीखंडकर यांच्या स्मृतिदिनी छापण्यात आले होते. तेव्हा या बातमीची दखल घेत तिवसा मतदार संघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी स्मारकासाठी जागा नियोजित करून दहा लाख निधी मंजूर केला. अवघ्या महिन्याभरात सचिन श्रीखंडकर यांचे स्मारक तिवसा पोलीस ठाण्याच्या खुल्या जागेत बांधण्यात आले. शुक्रवारी स्मारकाचे उद्घाटन शहीद सचिन श्रीखंडकर यांचे वडील सुदाम श्रीखंडकर व आई चंद्रकला यांच्या हस्ते करण्यात आले.

बाईट - सुदामराव श्रीखंडकर, सचिनचे वडिल.
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS